Special Report | मुंबईत चोरट्याला सिनेस्टाईल पाठलाग, चोराला दागिन्यांऐवजी बेदम मार
पोलीस आणि चोर यांच्यात तासनतास वाद झाल्यानंतर अचानक एका चोराने छतावरुन उडी मारली आणि पळून जाऊ लागला. तेव्हा पोलीस पथकाने त्याला फिल्मी स्टाईलने रस्त्यावर धावताना पकडले, तर त्याचा एक साथीदार पळून गेला. या घटनेचे थेट छायाचित्रण सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहे.
मुंबई : मुंबईच्या कांदिवली पोलिसांनी एका दागिन्यांच्या दुकानात दरोडा घालण्यापूर्वीच फिल्मी स्टाईलने चोरट्याला अटक केली आहे. चोर पोलिसांच्या अटकेचे थेट चित्र सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहे. ही घटना कांदिली पश्चिम फाटक रोडवर असलेल्या मोनिका ज्वेलर्सची आहे. 18 ऑक्टोबरच्या रात्री 2 वाजून 20 मिनिटांनी पोलिसांना बातमी मिळाली की काही लोक मोनिका ज्वेलर्सचे छप्पर तोडून ज्वेलर्स दुकान लुटत आहेत. बातमी मिळताच कांदिवली पोलिसांचे एक पथक घटनास्थळी पोहचले आणि चोरांना चारही बाजूंनी घेरले. पोलीस आरोपींना वारंवार शरण येण्याची विनंती करत राहिले, परंतु चोर पोलिसांसमोर हजर होण्यास तयार नव्हते. पोलीस आणि चोर यांच्यात तासनतास वाद झाल्यानंतर अचानक एका चोराने छतावरुन उडी मारली आणि पळून जाऊ लागला. तेव्हा पोलीस पथकाने त्याला फिल्मी स्टाईलने रस्त्यावर धावताना पकडले, तर त्याचा एक साथीदार पळून गेला. या घटनेचे थेट छायाचित्रण सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहे. सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसते की चोर वरुन खाली उडी मारतो आणि उठतो आणि पळू लागतो. तर मुंबई पोलिसांचे पथक त्यांच्या मागे धावताना दिसतात.