नाशिकमधील सिटी लिंक बससेवा पुन्हा ठप्प, कोणत्या मागणीसाठी कर्मचारी उतरले रस्त्यावर?

| Updated on: Aug 04, 2023 | 12:00 PM

VIDEO | नाशिक शहरातील बस सेवा पुन्हा विस्कळीत अन् सर्वसामान्य नागरिकांना फटका, गेल्या काही महिन्यांपासून कर्मचारी का जातायंत संपावर?

नाशिक, ४ ऑगस्ट २०२३ | नाशिक शहरातील सिटी लिंक वाहतूक सेवा पुन्हा एकदा ठप्प झाली आहे. गेल्या वर्षभरात सिटी लिंक बस कर्मचाऱ्यांचं हे चौथं आंदोलन आहे. अनेकदा सिटी लिंक बस कर्मचाऱ्यांचे वेतन न दिल्याने कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी होती. मात्र वेतन थकल्याने आजपासून पुन्हा संपाचं हत्यार उपसल्याचे समोर आले आहे. गेल्या काही महिन्यांपासून वारंवार वेतन थकत असल्याने कर्मचारी संपावर जात आहेत. मागच्या काही दिवसांपूर्वीच संप झाल्यानंतर वेतन वेळेवर देण्याचे ठेकेदाराने आश्वासन दिले होते. मात्र ते आश्वासन कर्मचाऱ्यांना देऊन देखील वेतन न मिळत असल्याने कर्मचारी पुन्हा संतप्त झाले आहेत. नाशिक शहरातील बस सेवा पुन्हा विस्कळीत झाल्याने सर्वसामान्य नागरिकांना सिटी लिंक कर्मचाऱ्यांच्या संपाचा फटका बसला आहे.

Published on: Aug 04, 2023 11:49 AM
दुगारवाडी धबधबा वाहतोय ओसांडून, पाहा ड्रोनद्वारे विहंगम दृश्य
पावसामुळे पुणे-सातारा महामार्गाची दुरावस्था, रस्त्यांची वाईट अवस्था अन् वाहनचालक हैराण