26/11 च्या रात्री मुंबईत दहशतवादी शिरले, मुंबई पोलिसांना कुणी केला फोन अन्…

| Updated on: Nov 27, 2023 | 12:43 PM

२६/११ च्या रात्री मुंबईत आतंकवादी घुसल्याचा दावा करणारा एक कॉल मुंबई पोलिसांच्या मुख्य नियंत्रण कक्षाला आल्याची माहिती समोर येत आहे. मानखुर्द पोलीस चौकी एकता नगर मध्ये २-३ आतंकवादी आल्याची माहिती कॉलरने दिली.

मुंबई, २७ नोव्हेंबर २०२३ : मुंबईत झालेल्या २६/११ च्या घटनेला १५ वर्ष पूर्ण झाली आहेत. पाकिस्तानच्या १० अतिरेक्यांनी २६ नोव्हेंबर २००८ रोजी दहशतवादी हल्ला घडवला होता. तो काळा दिवस आणि त्याच्या आठवणी अजून ताज्या असताना पुन्हा एकदा एका निनावी कॉलने मुंबईमध्ये खळबळ उडाली आहे. २६/११ च्या रात्री मुंबईत आतंकवादी घुसल्याचा दावा करणारा एक कॉल मुंबई पोलिसांच्या मुख्य नियंत्रण कक्षाला आल्याची माहिती समोर येत आहे. मानखुर्द पोलीस चौकी एकता नगर मध्ये २-३ आतंकवादी आल्याची माहिती कॉलरने दिली. या कॉलनंतर मुंबई पोलिसांनी वेगाने तपास सुरू केला आहे. यापूर्वीच मुंबई पोलिसांच्या कंट्रोल रूमला असाच एक धमकीचा फोन आला होता. मुंबईत मोठा घातपात करणार असल्याची धमकी कॉल करणाऱ्या व्यक्तीने दिली. यामुळे यंत्रणा अलर्ट मोडवर आहे.

Published on: Nov 27, 2023 12:43 PM
मुंबईतील कुर्ला येथे मराठी पाट्यांसाठी मनसे आक्रमक, फिनिक्स मॉलबाहेर बाचाबाची
Chhagan Bhubal : राजे, तुम्ही वंशज, सर्वांना समान न्याय द्या; छगन भुजबळ यांची आर्त हाक