Kolhapur | कोल्हापुरात भाजप-राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची धक्काबुक्की
किरीट सोमय्या यांच्या कोल्हापूर दौऱ्यावरुन भाजप आणि राष्ट्रवादीत जो तणाव निर्माण झालाय तो अद्यापही निवाळला नसल्याचं चित्र आहे. कोल्हापुरात एका वृत्तपत्राच्या कार्यक्रमात डिबेट कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमानंतर दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद झाला. त्याचं रुपांतर थेट हाणामारीत झालं.
कोल्हापुरात भाजप आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड धक्काबुक्की झाली. कोल्हापुरात शिवाजी उद्यमनगर परिसरात हा सगळा प्रकार घडला. भाजप नेते किरीट सोमय्या कोल्हापूर दौरा करणार होते. किरीट सोमय्या त्यासाठी कोल्हापुरला रवाना देखील झाले होते. पण तो दौरा कराडमध्ये थांबला. सोमय्या यांचा दौरा थांबला जरी असला तरी या दौऱ्यावरुन भाजप आणि राष्ट्रवादीत जो तणाव निर्माण झालाय तो अद्यापही निवाळला नसल्याचं चित्र आहे. कोल्हापुरात एका वृत्तपत्राच्या कार्यक्रमात डिबेट कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमानंतर दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद झाला. त्याचं रुपांतर थेट हाणामारीत झालं.
Published on: Sep 20, 2021 09:39 PM