नितेश राणे यांना गाडीत कोंबायला हवं होतं, चिपळूणमधील राड्यानंतर भास्कर जाधव पोलिसांवरच भडकले
चिपळूणमध्ये राणे आणि जाधव समर्थकांकडून दगडफेक करण्यात आली. त्यानंतर निलेश राणे यांनी भास्कर जाधव यांना सोडणार नसल्याचा इशारा दिला. दरम्यान, चिपळूनमध्ये झालेल्या या मोठ्या राड्यावर ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
चिपळूण, १७ फेब्रुवारी २०२४ : मंत्री नारायण राणे आणि ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांच्या समर्थकांमध्ये चिपळूण येथे राडा झाला. नुसताच राडा नाहीतर दोन्ही गटाकडून दगडफेक करण्यात आली. त्यानंतर निलेश राणे यांनी भास्कर जाधव यांना सोडणार नसल्याचा इशारा दिला. दरम्यान, चिपळूनमध्ये झालेल्या या मोठ्या राड्यावर ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. पोलिसांनी गुन्हे दाखल करण्यापूर्वी संपूर्ण फुटेज चेक करावं. सगळा घटनाक्रम बघावा. आम्ही पोलिसांना पूर्वीच अस काहीतरी घडणार याची कल्पना दिली होती, पत्रव्यवहार केला होता. पोलिसांनी त्याची दखल घेतली का ? असा सवाल करत भास्कर जाधव पोलिसांवर आक्रमक होताना दिसले. निलेश राणेंची सभा गुहागरला होती. निलेश राणे मुंबईवरुन आले. वास्तविक त्यांना गुहागरला जाण्यासाठी दोन मार्ग आहेत. खेड-दापोलीतून दुसरा चिपळूण-पेडे परशुमरावरुन ते थेट गुहागराला जाऊ शकत होते. तो मार्ग सोडून ते चिपळूण शहरात ते आत 60 किलोमीटरपर्यंत आल्याचे म्हणत त्यांनी निलेश राणे यांच्यासह पोलिसांवरही हल्लाबोल केला.