बारामतीतून लढणार म्हणजे लढणार, शिवतारेंचं दादांना थेट आव्हान अन् महायुतीत घमासान

| Updated on: Mar 14, 2024 | 11:08 AM

शिंदे गट आणि अजित पवार गट यांच्यात जोरदार घमासान पाहायला मिळत आहे. अजित पवार गटावर शाब्दिक तोफ डागत शिंदे गटाचे नेते विजय शिवतारे यांनी बारामतीतून लोकसभा लढणार म्हणजे लढणार असा निर्धार व्यक्त केलाय.

मुंबई, १४ मार्च २०२४ : बारामतीमधून पुन्हा एकदा लोकसभा लढणारच असं आव्हान विजय शिवतारे यांनी अजित पवार यांना दिलंय. यानंतर शिंदे गट आणि अजित पवार गट यांच्यात जोरदार घमासान पाहायला मिळत आहे. अजित पवार गटावर शाब्दिक तोफ डागत शिंदे गटाचे नेते विजय शिवतारे यांनी बारामतीतून लोकसभा लढणार म्हणजे लढणार असा निर्धार व्यक्त केलाय. पुरंदरमध्ये पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत बारामती लढवायची असा एकमतानं ठराव मंजूर केलाय. बारामतीमधून शरद पवार गटाकडून सुप्रिया सुळे विरुद्ध अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या सुनेत्रा पवार यांची लोकसभेची लढाई निश्चित मानली जात आहे. अशातच विजय शिवतारे हे अपक्ष म्हणून लढणार असल्याचे त्यांनी म्हटलंय. शिवतारे यांनी अजित पवार यांच्याविरूद्ध राजकीय कालवा उपसल्याने अजित पवार गट आणि शिंदे गटात राजकीय घमासान पाहायला मिळत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुकदर्शक का? निष्ठेची व्याख्या काय? असा सवाल करत अजित पवार गटानं शिवतारेवरून मुख्यमंत्री शंका उपस्थित केली आहे. बघा यासंदर्भातील स्पेशल रिपोर्ट…

Published on: Mar 14, 2024 11:08 AM
जागावाटपापूर्वी भाजपकडून 20 उमेदवारांची यादी जाहीर, ‘या’ 4 विद्यमान खासदारांचं तिकीट कापलं
नाशिक लोकसभेवर दावा करत श्रीकांत शिंदेंच्या ‘त्या’ घोषणेची भाजपनं काढली हवा