Pune School | पुण्याच्या ग्रामीण भागात पहिली ते चौथीचे वर्ग आजपासून सूरु
पुणे जिल्ह्यात कोरोनामुळे गेल्या दोन वर्षांपासून बंद असलेली शाळेची घटना पुन्हा एकदा वाजली आहे. आजपासून पहिली ते चौथीपर्यंतच्या शाळा सुरु करण्यात आल्या आहेत.
पुणे जिल्ह्यात कोरोनामुळे गेल्या दोन वर्षांपासून बंद असलेली शाळेची घटना पुन्हा एकदा वाजली आहे. आजपासून पहिली ते चौथीपर्यंतच्या शाळा सुरु करण्यात आल्या आहेत. वडगाव मावळमध्ये ढोल ताशाच्या गजरात विद्यार्थ्यांचं स्वागत करण्यात आले. शाळांमध्ये कोरोनाच्या नियमांचे कडक पालन करण्याच्या सूचना प्रशासनाकडून देण्यात आले आहे. कोरोनामुळे दोन वर्ष शाळेपासून लांब राहिलेली मुले शाळा सुरु झाल्याने पुन्हा एकदा आनंदली आहेत. मावळमध्ये सभापती कृषि व पशुसंवर्धन बाबुराव आप्पा वायकर यांनी वडगाव मावळ येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांची पोटोबा महाराज प्रांगण ते मुख्य बाजारपेठेतून ढोल ताशांच्या गाजरामध्ये मिरवणूक काढली. शिक्षकांनी तसेच गावातील शिक्षकांनी तसेच गावातील नागरिकांनी पुष्प गुच्छ देत विद्यार्थ्यांचे स्वागत केले. ओमिक्रॉनचा वाढता धोका लक्षात घेत प्रशासनही सज्ज झाले आहे. ओमिक्रॉनच्या स्थितीचा आढावा घेऊनच मुंबई – पुण्यातील शाळांचा निर्णय घेतला जाईल, अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. शाळा सुरु करण्याबाबत तेथील जिल्हा प्रशासनाबरोबर चर्चा करून शाळांचा निर्णय घेतला जाणार असल्याचेही त्या म्हणालया आहेत.