बदलापूरची घटना ताजी असताना नंदुरबारमध्येही धक्कादायक प्रकार, शाळेतील सफाई कामगाराने 5 वीत शिकणाऱ्या…

| Updated on: Aug 28, 2024 | 5:49 PM

बदलापूर येथील शाळेतील चिमुकल्या मुलींवरील लैंगिक अत्याचाराची घटना ताजी असताना नंदुरबार शहरातल्या शाळेत अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याचा प्रकार समोर आला आहे. सफाई कामगाराने अल्पवयीन विद्यार्थिनीला आपल्या मोबाईलमध्ये अश्लील व्हिडिओ दाखवल्याचा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे.

नंदुरबार शहरातील एका नामांकित शाळेत सफाई कामगाराने पाचवीत शिकणाऱ्या एका अल्पवयीन विद्यार्थिनीला आपल्या मोबाईलमध्ये अश्लील व्हिडिओ दाखवून विनयभंग केल्याचा खळबळजनक प्रकार उघड झाला आहे. हा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाला असून या घटनेविषयी सदर विद्यार्थिनीने आपल्या पालकांना सांगितले. यानंतर पालकांनी नंदुरबार शहर पोलीस स्टेशनला तक्रार नोंद केली. त्या तक्रारीवरून शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कर्मचाऱ्याला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले असून शाळेकडून या कर्मचाऱ्यावर कारवाई करून त्याला बडतर्फ करण्यात आले आहे. या घटनेप्रकरणी नंदुरबार शहरातील पालकांमध्ये आपल्या विद्यार्थिनी विषयी असुरक्षिततेची भावना समोर येत आहे. पोलिसांनी या संदर्भात योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी पालकांनी केली आहे. याप्रकरणी शहर पोलिसात गुन्हा दाखल झाला असून पोलीस तपास करत आहेत, अशी माहिती नंदुरबार पोलीस अधीक्षक श्रावण दत्त एस यांनी दिली आहे. दरम्यान या खळबळजनक प्रकारानंतर शाळेतील मुलींच्या सुरक्षिततेविषयीचा प्रश्न पुन्हा एकदा समोर आला आहे.

Published on: Aug 28, 2024 05:49 PM
‘शिवरायांच्या ‘त्या’ पुतळ्याचं उद्धाटन करणाऱ्या मोदींनी पहिले उठबशा काढाव्या अन् फडणवीसांनी एक नाहीतर…’, बच्चू कडू नेमकं काय म्हणाले?
‘राड्यामुळे शिवसेना पुढे आली, तो शेंबडा होता तेव्हा…’, नाव न घेता राणेंचा हल्लाबोल