पुणेकरांनो तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी, ‘या’ दिवशी जिल्ह्यात मेघगर्जनेसह कोसळणार पाऊस

| Updated on: Apr 07, 2023 | 8:31 AM

VIDEO | पुणे शहरातील तापमान वाढल्यानं वातावरणात बदल, कोणत्या दिवशी असणार येलो अलर्ट

पुणे : पुणेकरांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. पुढील तीन दिवस जिल्ह्यात यलो अलर्ट असणार आहे. तर पुणे शहरातील तापमान वाढल्याने वातावरणात मोठा बदल झाल्याचे पाहायला मिळत आहे. तर जिल्ह्यात यलो अलर्ट असल्याने विजांच्या कडकडाटासह शहरात हलक्या पावसाची शक्यताही हवामान खात्याकडून वर्तवण्यात येत आहे. ढगाळ वातावरण व अवकाळी पाऊस असतानाही पुणे शहरातील तापमान वाढल्यानं वातावरणात मोठ्या प्रमाणात बदल झाला आहे. पुणे शहरात व जिल्ह्यांत 7, 8, 9 तारखेला विजांच्या कडकडासह शहरात हलक्या पावसाची शक्यता आहे. फेब्रुवारीनंतर प्रथमच पुणे जिल्ह्याचा पारा एप्रिलमध्ये चाळिशीच्या पार गेला आहे. राज्यातील अनेक शहराचे तापमान चाळीस अशांवर गेले आहे. तर बुधवारी संपूर्ण पुणे जिल्ह्याचे सरासरी कमाल तापमान 37 ते 40 अंशांवर होते. यंदा संपूर्ण फेब्रुवारी महिन्यात पुणे जिल्हा राज्यात बहुतांश वेळा तापमानात आघाडीवर होता.

Published on: Apr 07, 2023 08:26 AM
वाहन धारकांनो समृद्धी महामार्गावर जाताय!; आधी वाहन तपासा, अन्यथा ‘या’ कारणामुळे ‘नो एन्ट्री’
पुण्याच्या भोर तालुक्यात अवकाळी पावसानं नागरिकांची उडाली दाणादाण