वेदांता-फॉक्सकॉन संदर्भात मुख्यमंत्री आणि पंतप्रधानांची चर्चा!

| Updated on: Sep 14, 2022 | 1:01 PM

वेदांता-फॉक्सकॉनला महाराष्ट्रातून मोठी ऑफर असताना प्रकल्प गुजरातला कसा नेण्यात आला असा सवाल आता राजकीय नेत्यांकडून उपस्थित केला जातोय.

राज्यातून वेदांता-फॉक्सकॉन कंपनी (Vedanta Foxconn Company) गुजरातमध्ये गेली आणि राज्यात एकच खळबळ उडाली. दरम्यान या विषयावर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींशी (PM Narendra Modi) चर्चा केल्याचं समजतंय. शिंदे आणि मोदी यांनी एकमेकांशी रात्री उशिरा दूरध्वनीवरून संवाद साधल्याचं समजतंय.वेदांता-फॉक्सकॉनला महाराष्ट्रातून मोठी ऑफर असताना प्रकल्प गुजरातला कसा नेण्यात आला असा सवाल आता राजकीय नेत्यांकडून उपस्थित केला जातोय. महाराष्ट्रातून हा प्रकल्प गुजरातमधील अहमदाबादमध्ये हलविल्यानंतर राजकीय वर्तुळात सुद्धा चांगलीच चर्चा रंगलीये. वेदांता फॉक्सकॉन कंपनीला महाविकासआघाडी सरकारनं 39 हजार कोटींची सवलत दिली होती.अशी माहिती महाविकास आघाडीच्या नेत्यांनी दिलीये.

 

 

Published on: Sep 14, 2022 12:59 PM
शिंदे गटाकडून हा सगळा नकलीपणा, ढोंगीपणा सुरु आहे – चंद्रकांत खैरे
गोव्यात काँग्रेसला भाजपचा झटका