‘किमान तुम्ही तरी जनतेची दिशाभूल करू नका; पराभव स्वीकारला तर…’, फडणवीसांनी पवारांना थेट दिला दाखला

| Updated on: Dec 08, 2024 | 11:53 AM

शरद पवार यांनी निवडणुकीच्या आकडेवारीवरून शंका उपस्थित केल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी ट्वीट करत त्यांना जशाच तसे उत्तर दिलं आहे. लोकसभा निवडणुकीतील आकडेवारीचा देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवारांना थेट दाखवत दाखलाच दिला आहे.

‘शरद पवार आपण ज्येष्ठ नेते आहात.किमान आपण तरी जनतेची दिशाभूल करू नका. पराभव स्वीकारला तर यातून लवकर बाहेर याल’, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. शरद पवार यांनी निवडणुकीच्या आकडेवारीवरून शंका उपस्थित केल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी ट्वीट करत त्यांना जशाच तसे उत्तर दिलं आहे. लोकसभा निवडणुकीतील आकडेवारीचा देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवारांना थेट दाखवत दाखलाच दिला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करत असं म्हटलं की, ‘आपण ज्येष्ठ नेते आहात, किमान आपण तरी देशातील जनतेची दिशाभूल करू नका. जास्त मतं मिळूनही कमी जागा कशा? चला 2024 लोकसभेत काय झाले ते पाहू, भाजपाला मतं 1,49,13,914 आणि जागा 9, पण काँग्रेसला मतं 96,41,856 आणि जागा 13. शिवसेनेला 73,77,674 मतं आणि 7 जागा, तर राष्ट्रवादी-शरद पवार गटाला 58,51,166 मतं आणि 8 जागा. 2019 च्या लोकसभेचे उदाहरण तर फारच बोलके आहे. काँग्रेसला 87,92,237 मतं होती आणि 1 जागा मिळाली, तर तत्कालीन राष्ट्रवादीला 83,87,363 मतं होती आणि जागा 4 आल्या’, पुढे त्यांनी असंही म्हटलं पराभव स्वीकारला तर यातून लवकर बाहेर याल! तुम्ही तरी आपल्या सहकाऱ्यांना आत्मपरीक्षण करण्याचा सल्ला द्याल, अशी अपेक्षा आहे.

Published on: Dec 08, 2024 11:53 AM
सोमय्यांचा अभ्यास खोटा? दादांना दिलासा मोठा; महायुतीत उपमुख्यमंत्रिपदाची शपथ अन् दुसऱ्याच दिवशी संपत्तीची वापसी
Ajit Pawar : ‘तू गप्प बसं.. ते नेहमीसारखं उशीर…’, शिंदेंच्या उशिरा येण्यावर दादांची मिश्किल टोलेबाजी