CM Fadnavis Video : नागपुरात हिंसाचारावेळी महिला पोलिसांचा विनयभंग… मुख्यमंत्री स्पष्टच म्हणाले, ‘…त्यांना कबरीतूनही खोदून काढणार’

| Updated on: Mar 20, 2025 | 10:31 AM

नागपूरच्या हिंसाचारात हिंसक जमावानं पोलिसांनाही सोडलं नाहीये. पोलिसांवर दगडफेक तर झालीच पण महिला पोलिसांचा विनयभंग सुद्धा करण्यात आला. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी आता कारवाईचा सज्जड इशारा दिलाय.

नागपूरच्या हिंसाचारा वेळी पोलिसांवर हल्ला केला. त्यांना कबरीतूनही खोदून काढू असा सज्जड इशाराच मुख्यमंत्र्यांनी हल्लेखोरांना दिलाय. नागपूरच्या हिंसाचारादरम्यान महिला पोलिसांचा विनयभंग झाल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी दाखल केलेल्या एफआयआरमध्येही महिला पोलिसांसोबत विनयभंग झाल्याचा उल्लेख आहे. तशी तक्रार महिला पोलीस कर्मचाऱ्यांकडून दाखल झाली. जमावातील काही लोकांनी बंदोबस्तातील महिला अंमलदार यांना अंधाराचा फायदा घेत विनयभंग केलाय. जमावानं इतर महिलांनाही अश्लील शिवीगाळ करत हल्ला केलाय. तर नागपुरातला हिंसाचार सत्ताधरांनीच घडवला असा गंभीर आरोप नाना पटोले यांनी केलाय आणि न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेत चौकशीची मागणी केली. दुसरीकडे ज्या विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलच्या आंदोलनात धार्मिक मजकूर किंवा आयती जाळल्याची अफवा पसरली, पण तपासात आयती जाळला नसल्याच स्पष्ट झाल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली आहे. दरम्यान, संघाच्या मुख्यालयापासून काही अंतरावरच असलेल्या महालमधील चिटनीस पार्क या ठिकाणी हिंसाचार झाला आहे. संघानेही ओरंगजेबाच्या कबरीवरून भूमिका स्पष्ट करताना सध्या हा मुद्दा संयुक्तीत नसल्याचं म्हटलंय. म्हणजेच कबर हटवण्याची मागणी करणाऱ्या भाजपच्या विरोधात संघाने भूमिका घेतली आहे.

Published on: Mar 20, 2025 10:30 AM
Satish Bhosale : ‘आमची बदनामी थांबवा’; खोक्याच्या बायकोच जिल्हाधिकारी कार्यालयात उपोषण
भाजपची सत्ता राज्यासह केंद्रात असूनही औरंगजेबाची कबर का हटवली जात नाही? कबरीचं संवर्धन सरकार काढेल?