‘भुजबळ एकटेच तरी संपूर्ण सभागृह डोक्यावर घ्यायचे पण…’, विरोधकांना फडणवीसांचा चिमटा

| Updated on: Mar 25, 2025 | 1:46 PM

'गृहमंत्री असलो की प्रत्येक गोष्टीचा थेट संबंध माझ्याशी जोडला जातो. 2022 ते 24 तुम्ही मला टार्गेट केलं. पण परिणाम काय झाला, लोकांनी आधीपेक्षा रेकॉर्ड मँडेट आम्हाला दिलं'

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेच्या अधिवेशनात अंतिम आठवडा प्रस्तावावर बोलत असताना विरोधकांना चांगलंच फटकारलं. ‘विरोधकांना विरोधी पक्षांच्या भूमिकेत जावं लागेल. विधानसभेच्या अधिवेशनातील अंतिम आठवड्याचा प्रस्ताव ही एक अशी संधी असते, ज्या विषयावर चर्चा होऊ शकली नाही पण महत्त्वाचे विषय अंतिम आठवडा प्रस्तावात मांडले जातात. पण दुर्देवानं तसं झालं नाही. जर विरोधकांना विरोधी पक्ष म्हणून कसं काम करायचं याचं प्रशिक्षण हवं असेल तर मी प्रशिक्षण द्यायला तयार आहे’, असं म्हणत देवेंद्र फडणवीसांनी विरोधकांना खोचक टोला लगावला. पुढे ते असेही म्हणाले की, विरोधकांच्या प्रशिक्षणासाठी मी व्हॉलिंटियर करायला तयार आहे. विरोधी पक्षाला विरोधी पक्षात कसं काम करायचं याचं प्रशिक्षण हवं असेल तर मी पक्षाचा अभिनिवेश विसरून हे प्रशिक्षण द्यायला तयार आहे. गरज पडली तर भुजबळ आणि मुनगंटीवार यांचीही मदत घेईन असा चिमटा मुख्यमंत्र्यांनी काढला. तर सक्षम विरोधी पक्ष असणं हे लोकशाहीत महत्त्वाचं आहे. छगन भुजबळ एकटेच होते पण अख्ख सभागृह डोक्यावर घ्यायचे. त्यामुळे भास्कर जाधव यांच्यासारखा जेष्ठ सदस्य असताना अंतिम आठवडा प्रस्तावावर अन्याय झाल्याचे फडणवीस म्हणाले.

Published on: Mar 25, 2025 01:46 PM
Prashant Koratkar : कोरटकरच्या सुनावणी दरम्यान कोर्टात काय झालं? इनसाईड स्टोरी
CM Devendra Fadnavis : जयकुमार गोरे प्रकरणात सुप्रिया सुळे, रोहित पवारांचा हात? मुख्यमंत्र्यांनी केले गंभीर आरोप