मुख्यमंत्री सहकुटुंब ‘शिवतीर्थ’वर, राज ठाकरे यांच्या भेटीला; काय आहे कारण?
VIDEO | मुंबईत राजकीय घडामोडींना वेग, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरे यांच्या भेटीसाठी ‘शिवतीर्थ’ निवासस्थानी
मुंबई : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीला त्यांच्या शिवतीर्थ या निवास्थानी दाखल झाल्याचे पाहायाला मिळाले. विशेष म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे त्यांच्या कुटुंबियांसह राज ठाकरे यांच्या भेटीला गेल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे राज ठाकरे यांच्या भेटीला गेल्याने अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. राज ठाकरे यांनी नुकतंच गुढीपाडव्याच्या दिवशी केलेल्या भाषणात एकनाथ शिंदे यांच्यावर सडकून टीका केली होती. त्यानंतर अशी घडामोडी घडताना दिसत आहेत. दरम्यान, या भेटीमागचे कारण अद्याप समोर आले नसून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरे यांच्या भेटीला का गेले असतील याची चर्चा सर्वत्र पाहायला मिळत आहे.
Published on: Mar 26, 2023 08:17 PM