‘लाडकी बहीण’वरून रवी राणा, महेश शिंदेंच्या वक्तव्यानं वाद पेटला, मुख्यमंत्री कॅबिनेटमध्ये मंत्र्यांना भरला दम

| Updated on: Aug 14, 2024 | 1:03 PM

अमरावतीचे आमदार रवी राणा यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेवरून केलेल्या एका वक्तव्याने राज्यात चांगलाच वाद पेटला असताना शिंदे गटाचे आमदार महेश शिंदे यांनी देखील चर्चा होईल असं वक्तव्य केलं. विधानसभेत विरोधात काम केल्यास लाडकी बहीण योजनेतून नाव डिलीट करू... असं म्हटलं

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेवरून अमरावतीचे आमदार रवी राणा आणि शिंदेंचे आमदार महेश शिंदे यांनी केलेल्या वक्तव्यामुळे राज्यात नवा वाद सुरू झाला. आमदार रवी राणा आणि शिंदेंचे आमदार महेश शिंदे य दोघांच्या वक्तव्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी मंत्रिमंडळ बैठकीत मंत्र्यांना दम भरला आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा अपप्रचार होईल, असे वक्तव्य करू नका. रवी राणा यांच्यासारखे आमदार ज्याप्रकारे भाष्य करतात ते चुकीचं आहे. अशा वक्तव्याचा विरोधकांनाच फायदा होतो, असे एकनाथ शिंदे म्हणाले. तर, लोकांमध्ये गैरसमज पसरवणाऱ्या आमदारांना वेळीच तंबी द्या, अशा सूचनाही एकनाथ शिंदे यांनी दिल्यात. यासोबत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत चांगला प्रचार करा, असे एकनाथ शिंदे यांनी आदेश दिले आहेत.

Published on: Aug 14, 2024 01:03 PM
बायकोचाही फोन लागणार नाही अशा जिल्ह्यात पाठवू, नितेश राणेंची पोलिसांना धमकी
शरद पवारांवर जिवापाड प्रेम करणारा अवलिया; काढलं छातीवर टॅटू अन् व्यक्त केली एकच इच्छा…