आ रहे है भगवाधारी ! अयोध्येत शिंदे-फडणवीस यांच्या स्वागताचे बॅनर
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अयोध्या दौऱ्यावर आहेत. आज ते रामलल्लाचं दर्शन घेणार असून यासाठी अयोध्येत त्यांच्या स्वागताची जोरदार तयारी करण्यात आली आहे.
अयोध्या : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( CM Eknath Shinde ) यांच्या स्वागतासाठी आयोध्या नगरी सज्ज झाली आहे. मुख्यमंत्र्यांच्या स्वागतासाठी ठिकठिकाणी बॅनर, होर्डिंग्स आणि पोस्टर्स लावण्यात आले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या सर्व आमदार आणि खासदारांसह रामलल्लाचं दर्शन घेणार आहेत. महाआरतीची तयारी देखील अंतिम टप्प्यात पोहोचलेली आहे. मंदिर परिसरात लोखंडी बॅरिकेट ऊभारण्यात आले असून ठिकठिकाणी कमान उभारण्यात आली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अयोध्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा मोठी बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
अयोध्येत संपूर्ण वातावर भगवमय झाल्याचं दिसून येत आहे. बॅनरवर मुख्यमंत्री यांचा भगवा धारी असा उल्लेख करण्यात आला आहे.
शरयू नदीच्या किनाऱ्यावर स्टेज उभारण्याच्या कामाला सुरुवात झाली असून याच ठिकाणी मुख्यमंत्री आपल्या सर्व सहकाऱ्यासोबतशरयूची आरती सुद्धा करणार आहेत.