पहाटेच्या शपथविधीवरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सभागृहात जोरदार मिश्किल टोलेबाजी, बघा व्हिडीओ
VIDEO | सभागृहात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पहाटेच्या शपथविधीवर भाष्य केलं अन् एकच हशा पिकला, बघा भन्नाट व्हिडीओ
मुंबई : पहाटेच्या शपथविधीला दोन अडीच वर्ष उटलून गेले तरी देखील राज्याच्या राजकारणात पहाटेच्या शपथविधीचा मुद्दा चांगलाच रंगताना दिसतोय. उपमुख्यमंत्री आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीसांनी शरद पवारांचं नाव घेत, tv9 मराठीच्या कार्यक्रमात गौप्यस्फोट केला. अजित पवारांसोबत शपथविधीआधी शरद पवारांची संमती होती, असं फडणवीस म्हणालेत. शरद पवार यांना विचारूनच हा निर्णय झाल्याचे सांगितल्यानंतर, मी अर्धीच गोष्ट सांगितली आहे, असा सूचक इशाराही देवेंद्र फडणवीस यांनी दिला होता. त्यामुळे राजकारणात पुन्हा खळबळ उडाली होती. यानंतर राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातही पहाटेच्या शपथविधी मुद्दा चांगलाच भाव खाऊन जोतोय. आज अधिवेशनाचा चौथा दिवस असून सभागृहात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलीच खडाजंगी पाहायला मिळत आहे. या दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पहाटेच्या शपथविधीवरून अजित पवार यांच्यावर चांगलीच टोलेबाजी केली.