Tv9 Special report | देवेंद्र फडणवीस यांचा दादांना झटका, अजित पवार यांचा ‘तो’ निर्णय रद्द!

| Updated on: Aug 31, 2023 | 5:13 PM

VIDEO | अजित पवार कामात हस्तक्षेप करत असल्याच्या तक्रारी, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर देवेंद्र फडणवीस यांचं नियंत्रण, अजित पवार यांची फाईल आता देवेंद्र फडणवीस तपासणार, पण का? बघा टिव्ही ९ मराठीचा स्पेशल रिपोर्ट

मुंबई, ३० ऑगस्ट २०२३ | अजित पवार कामात हस्तक्षेप करत असल्याच्या तक्रारी समोर आल्या होत्या. त्यानंतर मुख्यमंत्री शिंदे आणि फडणवीसांनी अजित पवारांवर दीड महिन्यातच कंट्रोल आणलाय. शिंदे आणि फडणवीसांनी दादांना मोठा धक्का दिलाय. अखेर अजित दादांना रोखण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीसांनी अजित दादांना झटका देत अखेर अजित दादांना रोखण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस अॅक्शन मोडमध्ये आलेच. उपमुख्यमंत्री फडणवीसांनी अजित दादांना झटका देत…साखर कारखान्याच्या कर्जावरुन काढलेला जीआर फडणवीसांनी रद्द केला. तर, अजित दादांचा कार्यक्षेत्रातील वाढता हस्तक्षेप रोखण्यासाठी मुख्यमंत्री शिंदेंनी मोठा निर्णय घेतलाय. यापुढे सरकारमधील नवे प्रस्ताव अजित दादांकडून फडणवीसांकडे जाणार आणि फडणवीसांच्या शेऱ्यानंतरच शिंदेंकडे मंजुरीसाठी जातील. म्हणजेच, अजित पवारांवर कंट्रोल आणण्यास शिंदेंनी आणि फडणवीसांनी सुरुवात केलीय. पहिला झटका तर देवेंद्र फडणवीसांनीच दिलाय. कोणता आहे तो झटका बघा स्पेशल रिपोर्ट…

Published on: Aug 30, 2023 11:01 PM
‘आमचं सरकार येऊ द्या मग बघा’, ठाकरे गटाच्या खासदाराचा भाजपला इशारा
Pankaja Munde यांचं शिवशक्ती यात्रेतून शक्तिप्रदर्शन? राजकीय विषयांवर बोलण्यास दिला नकार, पाहा स्पेशल रिपोर्ट