मराठा आरक्षणावर मुख्यमंत्री शिंदे यांचं मोठं भाष्य, मराठा आरक्षण मिळणार पण नेमकं कुणाला?

| Updated on: Feb 16, 2024 | 1:03 PM

मराठा आरक्षणावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठं विधान केले आहे. कुणावर अन्याय न करता कोणत्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देता येईल आणि मिळेल असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.

मुंबई, १६ फेब्रुवारी २०२४ : मराठा समाजास स्वतंत्र आरक्षण मिळण्यासाठी राज्य सरकारने सुप्रीम कोर्टात ‘क्युरेटिव्ह पिटिशन’ दाखल केली होती. ती न्यायालयाने स्वीकारली. यामुळे मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी ही शेवटची संधी असणार आहे. अशातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठं विधान केले आहे. मराठा समाजाला शैक्षणिक, सामाजिक मागासलेपणावर टिकणार आणि कायद्याच्या चौकटीत बसणार तसेच कुणावर अन्याय न करता कोणत्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देता येईल आणि मिळेल असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. तर ज्यांच्याकडे जुन्या कुणबी नोंदी असतील त्यांना मराठा आरक्षणाचा लाभ मिळणार नाही तर कुणबी नोंदी नसलेल्यांना मराठा आरक्षणाचा लाभ मिळणार आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले. दरम्यान मनोज जरांगे पाटील यांनी आपलं आंदोलन मागे घेतलं पाहिजे. सरकार मराठा आरक्षणाबाबतीत सकारात्मक आहे. त्यामुळे मराठा समाजाने कोणतंही आंदोलन करायला नव्हतं पाहिजे. पण जे आता सुरू आहेत ते आंदोलन मागे घ्यावं असे आवाहन देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा समाजाला केले आहे.

Published on: Feb 16, 2024 01:03 PM
संभाजीनगरची निवडणूक 2019 हून यंदा चुरशीची ठरणार? शिवसेनेच्या दोन्ही गटानं काय केला दावा?
अजित पवार यांच्या पत्नीला लोकसभेची उमेदवारी मिळणार? प्रचाराचा रथ फिरला अन्…