Priya Sarvankar : ‘त्यापेक्षा एखाद्या चित्रपटात काम केलं असतं तर चांगलं यश…’, सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला

| Updated on: Nov 14, 2024 | 5:08 PM

शिवसेना शिंदे गटाचे नेते सदा सरवणकर आणि मनसेचे नेते अमित राज ठाकरे यांच्यात मुंबईतील माहिम विधानसभा मतदारसंघात लढत होतेय. याकडे सर्वांचं लक्ष आहे. सदा सरवणकर यांची लेक प्रिया सरवणकर यांनी प्रचारसभेत बोलताना अमित ठाकरे यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे.

सामान्य माणूस समुद्र किनाऱ्यावर किती वेळ बसतो, याचा अभ्यास करा, असं म्हणत सदा सरवणकर यांची मुलगी प्रिया सरवणकर यांनी अमित ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. माहीम मतदारसंघातून मनसेकडून राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे हे पहिल्यांदाच विधानसभेच्या रिंगणात आहे. तर त्याच्या विरोधात महायुतीतील शिवसेना शिंदे गटाचे सदा सरवणकर निवडणूक लढवताय. दरम्यान, अमित ठाकरेंवर निशाणा साधताना प्रिया सरवणकर म्हणाल्या, ‘अमित ठाकरेंना माहीम मतदारसंघातील समस्या माहिती नाहीत. त्यापेक्षा एखाद्या चित्रपटात काम केलं असतं तर त्यांना चांगलं यश मिळालं असतं’, असं म्हणत त्यांनी अमित ठाकरेंवर खोचक निशाणा साधला. ‘विधानसभेत जेव्हा आपण उमेदवारी मागतो किंवा उमेदवार म्हणून आपण उभे राहतो, तेव्हा त्या मतदारसंघातील मूळ समस्या काय? हे जाणून घेतल्या पाहिजे पण हेच त्यांना माहिती नाहीये. त्यांनी समुद्र किनारा स्वच्छ करणार यापासून सुरूवात केली. पण लोकांना घरं नाहीत.. सामान्य लोकं किती वेळ समुद्र किनाऱ्यावर बसतात?’, असा सवालच त्यांनी उपस्थित केला.

Published on: Nov 14, 2024 05:02 PM
‘रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर दंश मारणार’, ठाकरे गटाच्या नेत्याचा हल्लाबोल
Dhananjay Munde : ‘पंकजा ताईंनी मोठं मन केलं म्हणून मी आज…’, भर सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?