Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी ठाण्यातील मतदान केंद्रावर कुटुंबियांसह बजावलं मतदानाचं कर्तव्य

| Updated on: Nov 20, 2024 | 12:08 PM

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या कुटुंबियांसह मतदानाचा हक्क बजावला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यातील कोपरी पाचपाखडी मतदारसंघातील मतदान केंद्रावर सहकुटुंब मतदानाचा अधिकार बजावला. यावेळी त्यांचं कुटुंब त्यांच्यासोबत होतं.

राज्यभरात आज महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या २८८ जागांसाठी मतदार पार पडत आहे. आज सकाळी सात वाजल्यापासून संध्याकाळी सहा वाजेपर्यंत मतदानाची प्रक्रिया सुरू राहणार आहे. सामान्य नागरिकांसह राजकीय नेते मंडळी, अभिनय क्षेत्रातील कलाकार मंडळी देखील आपला मतदानाचा हक्क बजावत आहेत. अशातच आज राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या कुटुंबियांसह मतदानाचा हक्क बजावला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यातील कोपरी पाचपाखडी मतदारसंघातील मतदान केंद्रावर सहकुटुंब मतदानाचा अधिकार बजावला. यावेळी मुख्यमंत्र्यांसोबत त्यांच्या पत्नी लता शिंदे, वडील संभाजी शिंदे, बंधू प्रकाश शिंदे, मुलगा खासदार श्रीकांत शिंदे आणि सून वृषाली शिंदे यांनी देखील आज ठाणे येथे मतदानाचं कर्तव्य बजावले. दरम्यान, ठाणे विधानसभा मतदारसंघातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वत: उमेदवार म्हणून विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात आहेत. एकनाथ शिंदे हे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून आनंद दिघेंचे पुतणे केदार दिघे यांच्या विरोधात निवडणूक लढवत आहेत. त्यामुळे ठाणे विधानसभा मतदारसंघातून नेमका विजय कोणाचा होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Published on: Nov 20, 2024 12:08 PM
Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीसांनी आपल्या कुटुंबासह नागपुरात बजावला मतदानाचा हक्क, म्हणाले…
Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी वांद्रे पूर्व येथे कुटुंबासह केलं मतदान, नागरिकांना आवाहन काय?