Eknath Shinde : महाराष्ट्राचे CM एकनाथ शिंदेच असणार की…? ‘टिव्ही 9 मराठी’च्या मुलाखतीत काय म्हणाले मुख्यमंत्री?

| Updated on: Nov 17, 2024 | 5:38 PM

'टीव्ही 9 मराठी'चे मॅनेजिंग एडिटर उमेश कुमावत यांनी एकनाथ शिंदे यांची मुलाखत घेतली. यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असणार? असा सवाल 'टिव्ही 9 मराठी'च्या मुलाखतीत त्यांना केला असता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी थेट उत्तर दिलं.

विधानसभा निवडणुकीच्या तोफा उद्या थंडावणार आहे. महाराष्ट्रात उद्याचा शेवटचा दिवस राजकीय पक्षांचा प्रचार होताना दिसणार आहे. निवडणुकीला हाताच्या बोटावर मोजण्याइतके दिवस बाकी असताना ‘टीव्ही 9 मराठी’ला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विशेष मुलाखत दिली. ‘टीव्ही 9 मराठी’चे मॅनेजिंग एडिटर उमेश कुमावत यांनी एकनाथ शिंदे यांची मुलाखत घेतली. यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असणार? असा सवाल ‘टिव्ही 9 मराठी’च्या मुलाखतीत त्यांना केला असता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी थेट उत्तर दिलं. ‘भाजपचे जास्त आमदार होते, त्यानंतर शिवसेनेचे होते. त्यानंतर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे होते. त्याप्रमाणेच जागांचं वाटप कऱण्यात आलंय. कोणाला किती जागा मिळाल्या यापेक्षा महायुतीला किती जागा मिळाल्या, याला आमचं महत्त्व आहे.’, असे एकनाथ शिंदे म्हणाले. ते पुढे बोलताना असेही म्हणाले, मुख्यमंत्री संख्याबळावर होणार की नाही यापेक्षा आधी आम्हाला महायुतीचं सरकार आणायचं आहे. त्यानंतर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाचा विषय हा सध्या दुय्यम आहे. अमित शाह यांनी देखील मुख्यमंत्रीपदावर भाष्य केले आहे. आम्ही मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री म्हणून निवडणुकीला सामोरे जातोय. राज्यात महायुतीचं सरकार आणण्यासाठी आम्ही पूर्ण मेहनत करत असल्याचे एकनाथ शिंदे म्हणाले. बघा आणखी काय म्हणाले एकनाथ शिंदे?

Published on: Nov 17, 2024 05:37 PM
शिंदेंच्या शिवसेनेनं उद्धव ठाकरेंना डिवचलं, बाळासाहेबांचा फोटो अन् त्यांच्याच वाक्याचा उल्लेख करत निशाणा
Eknath Shinde : असं नेमकं काय झालं? राज ठाकरे अन् शिंदेंमध्ये फाटलं, पक्ष-चिन्ह ढापण्याच्या टीकेवर मुख्यमंत्री स्पष्ट म्हणाले….