उद्धव ठाकरे यांनी नरेंद्र मोदीबाबत केलेल्या एकेरी उल्लेखावर एकनाथ शिंदे म्हणाले…
VIDEO | मुख्यमंत्री पदासाठी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले, उद्धव ठाकरे यांच्यावर कुणाचा हल्लाबोल
मुंबई : उद्धव ठाकरे यांची काल पाचोऱ्यात जाहीर सभा झाली. यासभेत उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा एकेरी उल्लेख केला. यामुळे भाजप नेते चांगलेच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान, आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीदेखील उद्धव ठाकरे यांच्या या वक्तव्यावरून निषेध व्यक्त केल्याचे पाहायला मिळाले. एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांचं हे वक्तव्य अत्यंत दुर्दैवी असल्याचं म्हटलंय. मोदी यांची लोकप्रियता देशातच नव्हे तर जगभरात असताना उद्धव ठाकरे यांनी द्वेषापायी हे वक्तव्य केल्याची टीका एकनाथ शिंदे यांनी केली. शिंदे म्हणाले, ‘ हे दुर्दैवी वक्तव्य आहे. या देशाचे प्रधानमंत्री मोदी साहेबांनी देशात नव्हे तर जगभरात सिद्ध केलंय. या देशाची अर्थव्यवस्था एवढ्या उंचीवर नेण्याची व्यवस्था केली आहे. जी 20 चं यजमानत्व मिळवलं आहे. मोदींचा एकेरी उल्लेख करणं याची जेवढी निंदा, निषेध करणं तेवढा थोडा आहे. प्रत्येक देशवासियांना अभिमान वाटावा, असं त्यांचं काम आहे. संपूर्ण देशातील दीडशे कोटी जनता त्यांचा परिवार आहे. जनतेला ते आपलं मानतात.