अन् विद्यार्थ्यांना यश आलं, MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर मुख्यमंत्री काय म्हणाले बघा
VIDEO | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी MPSC आयोगाला धन्यवाद देत काय म्हटले बघा व्हिडीओ
पुणे : एमपीएसचा नवा अभ्यासक्रम 2025 पासून लागू करावा, या मागणीसाठी दोन महिन्यांपासून विद्यार्थ्यांनी पुण्यात आंदोलन केले होते. अखेर MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला यश आले आहे. पुण्यातील MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनाची दखल घेत राजकीय नेत्यांनी आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांची भेट घेतली होती. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भेट घेत विद्यार्थ्यांच्या मागण्या ऐकून घेतल्या होत्या. त्यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांच्या मागण्या आयोगाला कळवल्या जातील असा शब्दही त्यांनी दिला होता. एमपीएससी विद्यार्थ्यांची प्रमुख मागणी मान्य झाल्यानंतर एमपीएससी विद्यार्थ्यांनी आंदोलन मागे घेतले. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनीही त्यांचे अभिनंदन करत आयोगाने आता अभ्यास करण्यासाठी वेळ दिला असल्याचे सांगितले. परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या सगळ्या विद्यार्थ्यांनी प्रयत्न केले, त्यामुळे विद्यार्थ्यांना यश आले असल्याचे मत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले आणि एमपीएससी आयोगाला धन्यवाद देखील दिले.