इंडिया आघाडीची सभा म्हणजे फॅमिली गॅदरिंग अन्… मुख्यमंत्र्यांचा ‘भारत जोडो’वरून घणाघात

| Updated on: Mar 18, 2024 | 4:57 PM

वीर सावकर यांच्या स्मारकासमोर आणि बाळासाहेबांच्या समाधीसमोर ही सभा झाली. खरंतर उबाठाच्या नेत्यांनी काल तिथे जाऊन माफी मागायला हवी होती, असेही मुख्यमंत्र्यांनी म्हणत ठाकरेंवर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला.

मुंबई, १८ मार्च २०२४ : कालची सभा ही एक फॅमिली गॅदरिंग होती. इतकंच नाहीतर कालची सभा भानुमतीचा कुनबा होता, असे म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी इंडिया आघाडी अर्थात राहुल गांधी यांच्या शिवाजीपार्क येथील सभेवर सडकून टीका केली आहे. ज्या लोकांना तडीपार करण्यात आलं ते लोकं कालच्या सभेत एकत्र आले होते. त्यांच्या चेहऱ्यावर नैराश्य होतं. कालचा दिवस काळा दिवस होता. वीर सावकर यांच्या स्मारकासमोर आणि बाळासाहेबांच्या समाधीसमोर ही सभा झाली. खरंतर उबाठाच्या नेत्यांनी काल तिथे जाऊन माफी मागायला हवी होती, असेही मुख्यमंत्र्यांनी म्हणत ठाकरेंवर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला. पुढे ते असेही म्हणाले, बाळासाहेबांचे विचार, भूमिका आणि विचारधारा उद्धव ठाकरे यांनी सोडली म्हणून आम्हाला वेगळा निर्णय घ्यावा लागला. आबकी बार तडीपार…असंच महाराष्ट्रातील शिवसैनिकांसह जनतेने ठाकरेंना केलंय. गेल्या ५०-६० वर्षात जे काँग्रेसने केले नाही ते मोदींनी १० वर्षांत करून दाखवलं त्याचा प्रत्यय विकासकामांच्या माध्यमातून समोर असे म्हणत मोदी सरकारचे मुख्यमंत्र्यांनी कौतुक केले.

Published on: Mar 18, 2024 04:57 PM
मग घाबरता कशाला? अजितदादांनी 2019 मध्ये केलेल्या वक्तव्यावर विजय शिवतारेंचं उत्तर
चिंता करु नका… महायुतीच्या जागावाटपाबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य