मुख्यमंत्र्यांनी ‘मविआ’च्या सभेवर एकाच वाक्यात केलं भाष्य; म्हणाले, ‘ही सभा वज्रमूठ नव्हे तर…’
VIDEO | संभाजीनगरमध्ये महाविकास आघाडीची राज्यातील पहिली संयुक्त सभा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल
मुंबई : महाविकास आघाडीची राज्यातील सर्वात मोठी संयुक्त अशी वज्रमूठ जाहीर सभा आज छत्रपती संभाजीनगर येथे होत आहे. या जाहीर सभेला शिवसेना ठाकरे गट, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस अशा महाविकास आघाडीचे नेते मंडळी उपस्थित आहेत. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केल्याचे पाहायला मिळाले आहे. महाविकास आघाडीची आजची सभा होत असली तरी ती वज्रमूठ नव्हे वज्रझूठ सभा आहे, अशी खोचक टीका त्यांनी महाविकास आघाडीच्या वज्रमूठ या सभेवर केली आहे. सत्तेसाठी जी लोकं हापापली आहेत ती लोकं एकत्र आली आहेत असा टोलाही मुख्यमंत्र्यांनी महाविकास आघाडीच्या वज्रमूठ सभेला लगावला आहे. तर आजच्या सभेवरून उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना त्यांनी राहुल गांधी यांनी सावरकर यांचा केलेल्या अपमानाची त्यांना आठवण करून दिली. ज्या लोकांनी सावरकरांचा अपमान केला आहे. त्यांच्यासोबत जाणाऱ्यांकडून हिंदुत्वाचा कसला आदर्श घेणार असं म्हणत नाव न घेता उद्धव ठाकरे यांना टोला लगावला आहे.