अयोध्या आम्ही दाखवली म्हणणाऱ्यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फटकारलं, म्हणाले…

| Updated on: Apr 08, 2023 | 10:50 PM

VIDEO | एकनाथ शिंदे उत्तर प्रदेशात दाखल झाल्यानंतर त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर साधला निशाणा, काय दिलं टीकेला उत्तर?

लखनऊ : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सर्व आमदार-खासदार आणि पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसोबत आज उत्तर प्रदेशात दाखल झाले आहेत. ते आज संध्याकाळी मुंबई विमानतळाहून लखनौच्या दिशेला रवाना झाले. त्यानंतर रात्री आठ वाजेच्या सुमारास लखनौला दाखल झाले. लखनऊमध्ये दाखल झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी ‘टीव्ही 9 मराठी’ला प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी ठाकरे गटावरही जोरदार हल्लाबोल केला. या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांना आम्ही अयोध्या दाखवली, अशी टीका ठाकरे गटाकडून करण्यात येतेय. यावर एकनाथ शिंदे यांना प्रश्न विचारला असता त्यांनी सडेतोड उत्तर देत उद्धव ठाकरे यांचं नाव न घेतला त्यांना फटाकारल्याचे पाहायला मिळाले. “त्यांना जनतेने घरचा रस्ता दाखवला. मी त्यावर उद्या सविस्तर बोलतो”, असं एकनाथ शिंदे म्हणाले. “मी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना धन्यवाद देतो. त्यांचे मंत्री स्वागतासाठी आले आहेत. हजारो कार्यकर्ते स्वागतासाठी आले आहेत”, असंदेखील एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले.

Published on: Apr 08, 2023 10:50 PM
भाजप निवडणुकीला घाबरतंय, काँग्रेसच्या ‘या’ नेत्यानं केला हल्लाबोल
आरपीआयचा महामेळावा, जय्यत तयारीसह सोमय्या मैदानात कसंय शक्तिप्रदर्शन?