बदलापूर प्रकरण फास्ट ट्रॅकवर चालवण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश; शिंदे म्हणाले, ज्या नराधमाने दुर्दैवी कृत्य केलं, त्याला…

| Updated on: Aug 20, 2024 | 12:15 PM

Badlapur ​​School Girls Rape Case : “तुमच्या मुली या आमच्याही मुली आहेत. आपण एकाच कुटुंबातील आहोत. आम्हीही संवेदनशील आहोत. यामुळे या अशाप्रकारच्या घटना यापुढे होऊ नये, म्हणून संस्था चालक, शाळा या सर्व लोकांसाठी एक नियमावली तयार केली जाईल, जेणेकरुन असे कृत्य यापुढे होणार नाही”, असेही एकनाथ शिंदे म्हणाले.

बदलापूर येथील एका नामांकित शाळेत साडेतीन वर्षांच्या दोन मुलींवर अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली असून त्यांनी‘टीव्ही 9 मराठी’शी संवाद साधला. यावेळी त्यांनी याप्रकरणी योग्य ती कारवाई केली जाईल. तसेच अशा संवदेनशील प्रकरणासंदर्भात एक नियमावली तयार केली जाईल, जेणेकरुन असे कृत्य यापुढे होणार नाही, असे आदेश एकनाथ शिंदेंनी दिले आहेत. ”मी याबद्दल पोलीस आयुक्तांशी बोललो आहे. पोलिसांनी याप्रकरणी मुख्य आरोपीला अटक केली आहे. पोलिसांनी त्या आरोपीवर अनेक कलम तात्काळ लावावी आणि हे प्रकरण फास्ट ट्रॅकवर चालवण्यात यावे. याप्रकरणी कोणालाही पाठीशी घातले जाणार नाही”, असे एकनाथ शिंदे यांनी म्हटले तर हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात घेऊन यावर तात्काळ कारवाई करुन कठोर शिक्षा देण्यात यावी. जेणेकरुन पुन्हा अशाप्रकारचे धाडस कोणी करणार नाही, असे आदेश एकनाथ शिंदेंकडून देण्यात आले आहेत.

Published on: Aug 20, 2024 12:15 PM
बदलापुरात संतप्त नागरिकांचा रेलरोको, चिमुरड्यांवर लैंगिक अत्याचार, नामांकित शाळेत नेमकं काय घडलं?
बदलापुरातील घटनेवर महिला-बालविकास मंत्री आदिती तटकरे म्हणाल्या, “शाळांमध्ये असे प्रकार…”