महायुतीच्या 18 जागांचा पेच अमित शाहांच्या दरबारी सुटणार? तोडगा काढण्यासाठी शिंदे-फडणवीस-दादा राजधानीत

| Updated on: Oct 24, 2024 | 4:44 PM

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दिल्लीत बैठक बोलावली होती. आज महायुतीची अमित शाहांसोबत दिल्लीत बैठक सुरू आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत दिल्लीत ही महायुतीची बैठक सुरू आहे.

महायुतीमध्ये अद्याप 18 जागांचा घोळ असल्याची माहिती आहे. महायुतीतील या 16 ते 18 जागांवर अंतिम तोडगा काढण्यासाठी महायुतीचे नेते राजधानी दिल्लीत आहेत. देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे कालच दिल्लीत दाखल झाले होते. एकनाथ शिंदे मात्र काल गेले नव्हते. तर आज एकनाथ शिंदे दिल्लीला रवाना झालेत. जागा वाटपात शिंदे गटाला जास्त जागा हव्या असल्याने पेच निर्माण झालाय. तर काही जागांबाबत अजित पवार गटही आग्रही आहेत. लोकसभेतील स्ट्राईक रेटमुळे अधिक जागांसाठी शिंदेंची जास्त जागा हव्या असल्याची मागणी आहे. तर हा महायुतीचा पेच अमित शाह यांच्या दरबारी सुटण्याची शक्यता आहे. अमित शाहांच्या उपस्थितीत आज सुरू असलेल्या दिल्लीतील बैठकीत नवाब मलिक यांच्या विधानसभेतील उमेदवारीचे भविष्य ठरणार असल्याची माहिती मिळत आहे. शिंदे गटाच्या २ आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या एका उमेदवारावर भाजपाचा आक्षेप आहे. दादांच्या राष्ट्रवादीच्या नवाब मलिक आणि मुलगी सना मलिकांच्या उमेदवारीला भाजपचा विरोध असल्याची माहिती मिळत आहे. तर शिंदे गटाकडून एन्काऊंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्मांच्या पत्नी स्वीकृती शर्मांच्या उमेदवारीला भाजपचा विरोध आहे.

Published on: Oct 24, 2024 04:44 PM