मनोज जरांगे पाटील यांनी दुतोंडी सरकारच्या ढोंगाचा बुरखा फाडला, Saamana Editorial मधून सरकारवर हल्लाबोल

| Updated on: Sep 05, 2023 | 8:23 AM

VIDEO | 'मनोज जरांगे पाटील यांनी दुतोंडी सरकारच्या ढोंगाचा बुरखा फाडला',जालन्यातील आंतरवाली सराटी या गावात मराठा आंदोलकांवर करण्यात आलेल्या लाठीचार्जच्या घटनेवरून सामनातून शिंदे सरकारवर सडकून टीका, Watch Video

मुंबई, ५ सप्टेंबर २०२३ | गेल्या आठवड्यात जालन्यातील आंतरवाली सराटी या गावात मराठा समाजातील काही आंदोलकांवर लाठीचार्ज करण्यात आला. या घटनेचे पडसाद राज्यभर उमटतांना दिसत आहे. तर मराठवाड्यातील मराठ्यांना कुणबी समाजाचं जात प्रमाणपत्र द्या अशी प्रमुख मागणी आंदोलक जरांगे पाटील यांनी केली आहे. अशातच जालन्यातील लाठीचार्ज घटनेवरून ‘सामना’तून शिंदे, फडणवीस आणि पवार सरकारवर निशाणा साधण्यात आला आहे. मनोज जरांगे यांनी दुतोंडी सरकारच्या ढोंगाचा बुरखा फाडला, असे म्हणत सामनातून सरकारवर हल्लाबोल करण्यात आला आहे. ‘मुख्यमंत्री शिंदे म्हणतात, मराठा समाजाच्या वेदनांची मला पूर्ण जाण आहे. मुख्यमंत्री हे खोटे बोलण्यात वस्ताद आहेत. आधी तुमची पोपटपंची बंद करा व जालन्यातील मराठा आंदोलकांवर गोळया चालवण्याचे, अमानुष लाठीमार करण्याचे आदेश कोणी दिले ते सांगा. तर तुम्ही खरे मराठा! एका तोंडाने आंदोलकांवर लाठय़ा-गोळय़ा चालवायचे आदेश द्यायचे व दुसऱ्या तोंडाने मला तुमच्या वेदनांची जाण आहे, असे सांगायचे हे ढोंग आहे. जालन्याच्या आंतरवाली गावातील मनोज जरांगे-पाटलांनी शिंदे-फडणवीस पवार या दुतोंडी सरकारच्या ढोंगाचा बुरखा फाडला आहे!’, असे म्हणत सामनातून हल्लाबोल करण्यात आलाय.

Published on: Sep 05, 2023 08:22 AM
Sharad Pawar यांच्या दिल्लीतल्या घरी INDIA च्या ‘या’ 13 समन्वयकांची बैठक होणार
अमरावतीकरांनो…तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी, ‘या’ दोन दिवशी शहरात पाणीपुरवठा राहणार बंद!