मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, उद्याच्या अयोध्येतील राम मंदिर सोहळ्याला जाणार नाही, कारण…
उद्या अयोध्येत राम मंदिराचं लोकार्पण आणि रामलल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. या ऐतिहासिक सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी अयोध्येसह संपूर्ण देश सज्ज झाला आहे. मात्र राम मंदिराच्या उद्घाटनासाठी महाराष्ट्रातील मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यासह मंत्रिमंडळातील एकही मंत्री उपस्थित राहणार नसल्याचे समोर आले आहे.
मुंबई, २१ जानेवारी २०२४ : संपूर्ण अयोध्या सध्या राममय झाली आहे. उद्या अयोध्येत राम मंदिराचं लोकार्पण आणि रामलल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. या ऐतिहासिक सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी अयोध्येसह संपूर्ण देश सज्ज झाला आहे. या भव्य-दिव्य लोकार्पण सोहळ्यासाठी सर्वत्र क्षेत्रातील दिग्गज आणि नामांकित लोकांना निमंत्रण पाठवण्यात आलं आहे. दरम्यान, राम मंदिराच्या उद्घाटनासाठी महाराष्ट्रातील मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यासह मंत्रिमंडळातील एकही मंत्री उपस्थित राहणार नसल्याचे समोर आले आहे. याची माहिती स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. तर २२ तारखेनंतर संपूर्ण मंत्रिमंडळासह राम मंदिरात जाऊन दर्शन घेणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. इतकंच नाहीतर राज्य मंत्रिमंडळासह खासदारांनाही घेऊन अयोध्येत रामाचं दर्शन घेणार असल्याचेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.