मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं हरियाणातील विजयानंतर ट्विट, ‘त्यांच्या स्वप्नांचा चुराडा झाला अन् आम्हाला विश्वास…’

| Updated on: Oct 09, 2024 | 12:45 PM

हरियाणा राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला आणि सर्वांचं लक्ष लागून राहिलेल्या हरियाणात भाजपचा मोठा विजय झाला. या विजयानंतर महाराष्ट्र भाजप देखील मोठा जल्लोष साजरा करत आहे. अशातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी देखील भाजपचं कौतुक केले आहे.

जातीवाद हरला आणि विकास जिंकला असं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हरियाणाच्या विधानसभा निवडणुकीच्या निकालावर ट्विट करून आपली प्रतिक्रिया दिली आहे. हरियाणातील जनतेने तिसऱ्यांदा डबल इंजिन सरकारवर विश्वास दाखवला, असेही एकनाथ शिंदे यांनी यामध्ये म्हटलं आहे तर मुख्यमंत्र्यांचं हेच ट्विट आता चर्चेत आहे. ‘हरियाणातील जनतेने सलग तिसऱ्यांदा डबल इंजिन सरकारवर विश्वास दाखवला आहे. या निर्विवाद यशाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह आणि भाजपचे अध्यक्ष जेपी नड्डांचे अभिनंदन… त्यांच्या अथक परिश्रमांमुळे त्यांच्या स्वप्नांचा चुराडा झाला. हरियाणाची जनता अभिनंदनास पात्र आहे. जनतेने काँग्रेसच्या घातक असणाऱ्या काँग्रेसच्या फेक नरेटिव्हला महत्व न देता भाजपच्या विश्वसनीयतेला निवडलं. तर महाराष्ट्राची जनता देखील अशा खोट्या नरेटिव्हच्या बळी पडणार नाही. दुहेरी इंजिन सरकारचा हा विकास प्रवास महाराष्ट्रातही सुरूच राहील, असा आम्हाला पूर्ण विश्वास आहे. ‘, असे एकनाथ शिंदे म्हणाले.

Published on: Oct 09, 2024 12:45 PM