मोदी कॅबिनेटचा शपथविधी होताच खदखद बाहेर, शिंदेंच्या शिवसेनेकडून भाजपवर दुजाभावाचा आरोप
शपथविधीला एक दिवस होत नाही तर शिंदे गटाकडून नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. शिंदेंच्या शिवसेनेकडून बुलढाण्याचे खासदार प्रतापराव जाधव यांनी राज्यमंत्री स्वतंत्रप्रभार पदाची शपथ घेतली मात्र ७ खासदार असतानाही कॅबिनेटपद का नाही? असा सवाल श्रीरंग बारणे यांचा आहे.
मोदींच्या कॅबिनेटच्या शपथविधीला एक दिवस होत नाही तर शिंदे गटाकडून नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. शिंदे गटाला कॅबिनेट मंत्रिपद न मिळाल्याने भाजपकडून दुजाभाव झाल्याचा आरोप शिंदेंचे खासदार श्रीरंग बारणे यांनी केला आहे. शिंदेंच्या शिवसेनेकडून बुलढाण्याचे खासदार प्रतापराव जाधव यांनी राज्यमंत्री स्वतंत्रप्रभार पदाची शपथ घेतली मात्र ७ खासदार असतानाही कॅबिनेटपद का नाही? असा सवाल श्रीरंग बारणे यांचा आहे. बारणेंनी एनडीएचा बिहारच्या एका घटक पक्षाचा उल्लेख केला. चिराग पासवान यांच्या एलजेपीचे ५ खासदार निवडून आले तरी त्यांना १ कॅबिनेटपद मिळालंय. तर शिंदे गटाच्या शिवसेनेकडून ७ खासदार निवडून आलेत तर शिंदे गटाला स्वतंत्र प्रभार राज्यमंत्रीपदच देण्यात आल्याचे त्यांनी म्हटले. म्हणजेच शिंदे गटाच्या शिवसेनेला एकही कॅबिनेटपद आलेलं नाही यावरून शिंदे गटाची नाराजी उघडपणे जाहीर झाली आहे.