सती-सावित्रीसारख्या महिलांनी आरोप केले तर…सुषमा अंधारे यांच्यावर शिंदेंच्या आमदाराचा निशाणा

| Updated on: Feb 05, 2024 | 6:16 PM

शिवसेनेतील आमदार संजय गायकवाड यांनी ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांना फटकारलं आहे. तर सती-सावित्रीसारख्या महिलांनी आरोप केले तर उत्तर देतो, असे संजय गायकवाड यांनी म्हणत सुषमा अंधारे यांच्यावर खोचक टीका करत निशाणा साधला आहे.

मुंबई, ५ फेब्रुवारी, २०२४ : सुषमा अंधारे सारख्या महिलेच्या आरोपावर उत्तर देणार नाही, असं म्हणत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील आमदार संजय गायकवाड यांनी फटकारलं आहे. तर सती-सावित्रीसारख्या महिलांनी आरोप केले तर उत्तर देतो, असे संजय गायकवाड यांनी म्हणत ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांच्यावर खोचक टीका करत निशाणा साधला आहे. दरम्यान, शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी जी अत्यंत घाणेरडी भाषा वापरली ती अजिबात समर्थनीय नाही. छगन भुजबळ हे मंत्री आहेत, त्यांना अशी भाषा वापरणं किंवा कोणत्याही व्यक्तीबद्दल अशी भाषा वापरणं हे चुकीचं आहे. लोकप्रतिनिधी इतकी गलिच्छ भाषा वापरत असेल तर एकनाथ शिंदेंनी बेलगाम झालेल्या आणि मुजोर, माजोर्डेपणा करणाऱ्या आमदारांना लगाम घालण्याची गरज आहे, असे वक्तव्य ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी करत मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल केला होता.

Published on: Feb 05, 2024 06:16 PM
कणकवलीत नसबंदी कुत्र्यांची सभा, भटक्या कुत्र्यांवर…; उद्धव ठाकरेंवर कुणाची जिव्हारी लागणारी टीका?
विनायक राऊत यांची ही शेवटची निवडणूक असणार? भाजप नेत्याचा मोठा दावा काय?