मनोज जरांगे पाटील यांनी जरा दमानं घ्यावं, गुलाबराव पाटील नेमकं काय म्हणाले?

| Updated on: Jun 14, 2024 | 2:22 PM

तर माझं हे शेवटचं उपोषण आहे. आता मी विधानसभा निवडणूक लढणवार, असं वक्तव्य मनोज जरांगे पाटील यांनी केलं आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या या वक्तव्यावर आणि त्यांनी सरकारला दिलेल्या एक महिन्याच्या अल्टिमेटमवर शिंदे गटाच्या शिवसेनेचे नेते, मंत्री गुलाबराव पाटील यांनी प्रतिक्रिया दिली

Follow us on

सगेसोयऱ्याच्या अंमलबजावणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला एक महिन्याचा वेळ दिल्यानंतर सरकारच्या शिष्टमंडळाने आम्ही तातडीने याबाबतच्या बैठका घेऊ आणि निर्णय घेऊ, असं आश्वासन मनोज जरांगे पाटील यांना दिलं. तर माझं हे शेवटचं उपोषण आहे. आता मी विधानसभा निवडणूक लढणवार, असं वक्तव्य मनोज जरांगे पाटील यांनी केलं आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या या वक्तव्यावर आणि त्यांनी सरकारला दिलेल्या एक महिन्याच्या अल्टिमेटमवर शिंदे गटाच्या शिवसेनेचे नेते, मंत्री गुलाबराव पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण आणि त्यांच्या मराठा समाजासाठीच्या मागण्यासंदर्भात सरकारने गेल्या काळात सकारात्मक निर्णय घेतले होते. आताही कालच्या सरकारच्या दोन नेत्यांनी मनोज जरांगे पाटील यांच्याशी सकारात्मकच चर्चा केली आहे. त्यामुळे मला असं वाटतं मनोज जरांगेंनी थोडं दमानं घ्यावं, चर्चेद्वारे प्रश्न सुटतात त्यांनी चर्चा करावी’, असा सल्लाही गुलाबराव पाटील यांनी दिला.