Eknath Shinde : सत्तास्थापनेपूर्वी एकनाथ शिंदेंचं मोठं ट्विट, ‘शिवसैनिकांनी माझ्या समर्थनार्थ एकत्र येऊ नये आणि…’

| Updated on: Nov 26, 2024 | 11:36 AM

भाजपचे अनेक कार्यकर्ते देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावेत यासाठी आग्रही आहेत. तर दिल्ली हायकमांडकडून त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. त्यातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्रीपदासाठी आग्रही असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

विधानसभेतील महायुतीच्या विजयानंतर महायुतीचा मुख्यमंत्री कोण होणार याकडे अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. अशातच भाजपचे अनेक कार्यकर्ते देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावेत यासाठी आग्रही आहेत. तर दिल्ली हायकमांडकडून त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. त्यातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्रीपदासाठी आग्रही असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तर एकनाथ शिंदे यांनी काही तासांपूर्वी त्यांच्या अधिकृत ट्वीटरवरुन एक ट्वीट केले आहे. या ट्वीटमध्ये त्यांनी शिवसैनिकांना महत्त्वाचे आवाहन केले आहे. तसेच सरकार स्थापनेबद्दलचाही मोठा दावा केला आहे. महायुतीच्या प्रचंड विजयानंतर राज्यात पुन्हा एकदा आपले सरकार स्थापन होणार आहे. महायुती म्हणून आपण एकत्रित निवडणूक लढवली आणि आजही एकत्रच आहोत. माझ्यावरील प्रेमापोटी काही मंडळींनी सर्वांना एकत्र जमण्याचे, मुंबईत येण्याचे आवाहन केले आहे. तुमच्या या प्रेमासाठी मी अत्यंत मनापासून ऋणी आहे. मात्र अशा पद्धतीने माझ्या समर्थनार्थ कुणीही एकत्र येऊ नये, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं आहे. ते पुढे असेही म्हणाले, पुन्हा एकदा माझी नम्र विनंती की शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी वर्षा निवासस्थान किंवा अन्य कुठेही एकत्र जमू नये. समर्थ आणि समृद्ध महाराष्ट्रासाठी महायुती भक्कम होती आहे आणि यापुढेही भक्कमच राहील, असे एकनाथ शिंदे यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटले आहे.

Published on: Nov 26, 2024 11:36 AM
महाराष्ट्राचा नवा CM कोण? उत्सुकता शिगेला, देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री होणार, हायकमांडचा ग्रीन सिग्नल?
एकनाथ शिंदे यांचा मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा, काळजीवाहू CM म्हणून पाहणार कारभार; नवा रोल काय?