मुख्यमंत्री शिंदेंच्या दरे गावची वाहतूक पूर्णपणे बंद, नेमकं कारण काय?

| Updated on: Jul 07, 2024 | 1:39 PM

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दरे गावातून मोठी बातमी समोर येत आहे. साताऱ्यातील दरे गावाला जाणारी आणि येणारी वाहतूक पुर्णपणे बंद असल्याचे समोर आले आहे. महाबळेश्वर तापोळा रोडवर आज सकाळी मोठ्या प्रमाणात दरड कोसळल्याची घटना घडली. या घटनेमुळे वाहतुकीवर मोठा परिणाम झाला.

सातारा जिल्ह्यातील तालुका महाबळेश्वर येथील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दरे गावातून मोठी बातमी समोर येत आहे. साताऱ्यातील दरे गावाला जाणारी आणि येणारी वाहतूक पुर्णपणे बंद असल्याचे समोर आले आहे. महाबळेश्वर तापोळा रोडवर आज सकाळी मोठ्या प्रमाणात दरड कोसळल्याची घटना घडली. या घटनेमुळे वाहतुकीवर मोठा परिणाम झाल्याचे पाहायला मिळाले. तर सध्या दरड आणि मातीचा ढिगारा हटवण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. पावसामुळे या परिसरात कायम दरड कोसळण्याच्या घटना घडत असतात, आजही पावसामुळे ही दुर्घटना घडल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान, मुख्यमंत्री शिंदे नेहमीच आपल्या गावी जात असतात. शिंदेंचं मन कायमच आपल्या दरे गावात रमत असल्याचे त्यांनी शेअर केलेल्या व्हिडीओवरून दिसते. गेल्या काही दिवसांपूर्वी लोकसभा निवडणुकीनंतर एकनाथ शिंदे यांनी आपल्या गावी काहिसा विसावा घेतल्याचे पाहायला मिळाले होते. त्यांनी ट्विटरवर एक व्हीडिओ शेअर करून यामध्ये त्यांनी आपलं साताऱ्यातील दरे गाव दाखवत अतिशय मोलाचा संदेश देखील दिला होता. बघा व्हिडीओ… (फॉरेन ट्रीप नाही तर शिंदेंचा आपल्या मूळ गावी फेरफटका)

Published on: Jul 07, 2024 01:39 PM
Maharashtra Weather Update : राज्यात मध्यरात्रीपासूनच संततधार, तुमच्या जिल्ह्यात कोणता अलर्ट? हवामान खात्याकडून मोठं अपडेट
मला हरभऱ्याच्या झाडावर चढवू नका, विजय वडेट्टीवार नेमकं काय म्हणाले?