मणिपूरमध्ये अडकलेल्या मुलांबाबत मुख्यमंत्र्याचा मोठा निर्णय, मुख्य सचिवांना दिल्या सूचना

| Updated on: May 07, 2023 | 3:03 PM

VIDEO | मणिपूरमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांबाबत काय म्हणाले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे?

कर्नाटक : गेल्या काही दिवसांपासून मणिपूर येथे हिंसा भडकल्याचे पाहायला मिळत आहे. या हिंसाचारात आतापर्यंत 52 जणांचा मृत्यू झाला आहे. तर मणिपूरमध्ये सुरू असलेल्या हिंसाचारामुळे संचारबंदी लागू करण्यात आली होती. दरम्यान, मणिपूरमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना महाराष्ट्रात परत आणण्यासाठी सत्ताधारी आणि विरोधी पक्षांनी कंबर कसली आहे. अशातच राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढाकार घेत सर्वतोपरी मदत करण्याचं आश्वासन दिलं. यानंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील मणिपूरमध्ये अडकलेल्या मुलांबाबत मोठा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्य सचिवांना सूचना दिल्या आहे. या सूचना देताना मुख्यमंत्र्यांनी स्पेशल विमानाची व्यवस्था करण्यास सांगितले आहे. तेथील महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांशी मुख्यमंत्र्यांनी संवाद साधला. घाबरलेल्या मुलांना धीर देत त्यांना काळजी करू नका, असेही सांगितल्याचे त्यांनी म्हटले आहे.

Published on: May 07, 2023 02:57 PM
ज्यांना माझे काम बघवत नाही तेच…; अजित पवार यांचा हिंतचिंतकांना थेट इशारा
Karnataka Elections 2023 : कर्नाटकात भाजपच्या प्रचाराचा सुपर संडे