Truck Driver Strike | … दक्षता घ्या, ट्रक चालकांच्या संपाबाबत मुख्यमंत्री शिंदे यांच्या सर्व जिल्हाधिकाऱ्यांना काय सूचना?
नव्या कायद्यानुसार, चालकाला १० वर्ष कैद आणि ७ लाखांचा दंड केला केलाय. वाहन कायद्यातील या बदलाच्या विरोधात ट्रक चालक आहे. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या संपाबाबत सर्व जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश दिले आहेत. राज्यभरात सुरू असलेल्या या संपासंदर्भात मुख्यमंत्री शिंदे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश दिले आहेत .
मुंबई, २ जानेवारी २०२४ : केंद्र सरकारच्या नवीन वाहन कायद्यामध्ये दुरूस्ती करा, याकरता देशभरातील ट्रक चालक आक्रमक झाले आहेत. १ जानेवारी ते ३ जानेवारीपर्यंत काही संघटना संपावर गेल्यात तर नागपूर, वसई, अकोला, मनमाड, अमरावती, गोंदियासह अनेक ठिकाणी ट्रकचालक आक्रमक होत त्यांची आंदोलनं सुरू आहे. एखादा ट्रकचालक धडक देऊन पळून गेल्यास त्याला ३ वर्षांची कैद असा पूर्वीचा कायदा होता. तर नव्या कायद्यानुसार, चालकाला १० वर्ष कैद आणि ७ लाखांचा दंड केला केलाय. वाहन कायद्यातील या बदलाच्या विरोधात ट्रक चालक आहे. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या संपाबाबत सर्व जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश दिले आहेत. राज्यभरात सुरू असलेल्या या संपासंदर्भात मुख्यमंत्री शिंदे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश दिले आहेत . कुठेही तणाव निर्माण होणार नाही याची दक्षता घ्या, अशा सूचना त्यांनी दिल्या आहेत.