सातासमुद्रापार शिवप्रेम पोहोचवणाऱ्या ‘या’ तरूणांचं मुख्यमंत्र्यांकडून कौतूक, बघा व्हिडीओ
VIDEO | रशियात शिवजयंती साजरी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्हिडीओ कॉल करून साधला शिवप्रेमींशी असा संवाद
कोल्हापूर : छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती राज्यभरात आणि राज्याबाहेर मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. मात्र हाच दिवस सातासमुद्रापार रशियामध्ये साजरा करणाऱ्या मराठी शिवप्रेमी तरुणांशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्हीसीद्वारे संवाद साधला. रशियामधील ओशत स्टेट युनिव्हर्सिटीमध्ये ७५० मराठी तरुण हे वैद्यकीय शिक्षण घेत आहेत. यंदा त्यांनी युनिव्हर्सिटीच्या प्रांगणातच शिवजयंती साजरी करण्याचा निर्णय घेतला. मात्र त्यांच्या या आयोजनाची मुख्यमंत्री महोदयांनी दखल घ्यावी अशी त्यांची इच्छा होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्हीसीद्वारे त्यांच्याशी संवाद साधला अन् त्यांची ही इच्छा पूर्ण झाली. मातृभूमीपासून लांब राहूनही शिवजयंतीचा सण साजरा करत आहात हे निश्चितच कौतुकास्पद आहे, असे म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रशियात शिवजयंती साजरी करणाऱ्या डॉक्टरांशी संवाद साधला.