मुख्यमंत्र्यांनी घेतली मुक्ता टिळकांची भेट; ‘या’ मुद्द्यावर झाली चर्चा
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाजप आमदार मुक्ता टिळकांच्या घरी त्यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाजप आमदार मुक्ता टिळकांच्या घरी त्यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली. “अशा परिस्थितीतही मी त्यांची तळमळ पाहिली. त्यांच्या मतदारसंघातील काही 40 वर्षांपूर्वींच्या इमारती पुनर्विकासासाठी अडली आहेत. त्याबाबत त्यांनी मला पत्रही दिलं. यावर मार्ग काढला तर पुणेकरांना मोठा फायदा होईल. याबाबत मी सकारात्मक भूमिका घेण्याच्या सूचना दिल्या आहेत”, अशी प्रतिक्रिया एकनाथ शिंदेंनी दिली.
Published on: Sep 07, 2022 05:40 PM