मोठ्या मनाचा माणूस…, राज ठाकरेंचं कौतुक करत शिंदेंचा ठाकरेंना खोचक टोला
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना केला असता त्यांनी राज ठाकरेंवर कौतुकाचा वर्षाव केल्याचे पाहायला मिळाले. मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, “राज ठाकरे चांगला, मोठ्या मनाचा माणूस आहे. कद्रू वृत्तीचा अन् कोत्या मनाचा नाही. जे आहे, ते मोकळ्या मनाने बोलतात आणि त्यांचे सगळे कार्यकर्ते.....
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला. यानंतर महायुतीला आणखी बळ मिळणार असल्याची चर्चा होतेय. अशातच राज ठाकरे यांनी महायुतीला पाठिंबा दिल्यानंतर महायुतीला लोकसभा निवडणुकीत किती फायदा होणार? असा सवाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना केला असता त्यांनी राज ठाकरेंवर कौतुकाचा वर्षाव केल्याचे पाहायला मिळाले. मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, “राज ठाकरे चांगला, मोठ्या मनाचा माणूस आहे. कद्रू वृत्तीचा अन् कोत्या मनाचा नाही. जे आहे, ते मोकळ्या मनाने बोलतात. त्यांचे सगळे कार्यकर्ते मनापासून काम करतायत. मी त्यांना धन्यवाद देतो”, असं शिंदे म्हणाले, तर “लोक विकासाला मत देणारं, लोकांना घरी बसून आरोप, शिव्या- शाप देणारे आवडत नाहीत. लोकांना विकास हवाय, विकास आवडतो”, असे म्हणत एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना खोचक टोला लगावला आहे.
Published on: Apr 29, 2024 03:06 PM