शिंदेंनी साताऱ्यात सांगितला गुवाहाटीचा किस्सा, ‘उठाव केला तेव्हा शंभूराज देसाई दोन पाऊलं माझ्या पुढं अन्…’

| Updated on: Nov 05, 2024 | 4:09 PM

विधानसभा निवडणुकीसाठी अवघे काही दिवस शिल्लक असताना राज्यभरात एकच प्रचारसभांचा धडाका पाहायला मिळत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या उमेदवारांसाठी प्रचारसभा घेण्यास सुरूवात केलीये. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महायुतीचे आणि शिवसेनेचे उमेदवार शंभुराज देसाई यांच्या प्रचारासाठी साताऱ्यातील पाटण येथे सभा घेतली.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महायुतीचे आणि शिवसेनेचे उमेदवार शंभुराज देसाई यांच्या प्रचारासाठी साताऱ्यातील पाटण येथे भर सभेत शंभुराज देसाई यांच्या विजयाचा विश्वास व्यक्त केला. इतकंच नाहीतर यावेळी त्यांनी उठावावेळचा गुवाहाटीचा किस्साही सांगितला. ”उठाव केला तेव्हा शंभूराज देसाई दोन पाऊलं माझ्या पुढे होते. म्हणून मी त्यांना दोन जिल्ह्याचे पालकमंत्री बनवले एक सातारा आणि दुसरा ठाणे जिल्हा…”, असं मिश्किलपणे एकनाथ शिंदे म्हणाले. ज्यावेळी आम्ही उठाव केला तेव्हा शंभुराज देसाई सर्वात पुढे होते माझ्या खांद्याला खांदा लावून उभे होते. त्यावेळेस त्यांनी कुठे चाललोय, काय करतोय, कशाला चाललोय, याबद्दल काहीही विचारले नाही. त्यांनी छातीचा कोट करून लढाई लढली आणि हेच पाटणचे पाणी मला दिसले. जो शब्द देतो, तो शब्द पाळणारा माणूस मला आवडतो. शंभुराज देसाईला घाबरायची गरज नाही कारण, त्याच्यामागे येडोबा आहे, नाईकबा आहे, भैरोबा आहे. ज्योतिबा आहे. सर्वांचे आशीर्वाद त्याच्यामागे आहेत. म्हणून कोणी येऊ देत, पाटणचा गड शंभुराज देसाईच सर करणार”, असं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शंभुराज देसाईंच्या विजयाचा विश्वास व्यक्त केला.

Published on: Nov 05, 2024 04:09 PM
धनुष्यबाण अन् शिवसेना कोणाची? साताऱ्यातील सभेतून एकनाथ शिंदेंचं राज ठाकरेंना प्रत्युत्तर
Saroj Ahire : ‘माझ्या विरोधात षडयंत्र अन्…’, अजित दादांच्या उमेदवार सरोज अहिरे यांच्या डोळ्यात पाणी