मुख्यमंत्र्यांच्या सभेसाठी गोळीबार मैदान सज्ज, बघा कशी सुरूये लगबग

| Updated on: Mar 16, 2023 | 4:58 PM

VIDEO | रत्नागिरीतील खेडमध्ये होणार एकनाथ शिंदे यांची जाहीर सभा, गोळीबार मैदानावर जोरदार तयारी सुरू

रत्नागिरी : रत्नागिरीतील खेडमध्ये उद्धव ठाकरे यांनी घेतलेली जाहीर सभा यावरून अद्याप राजकीय वर्तुळात चर्चेत असून त्यावर आरोप प्रत्यारोप होत आहेत. अशातच आता स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे खेडमध्ये जाहीर सभा घेणार आहे. १९ तारखेला खेडमध्ये मुख्यमंत्र्यांची जाहीर सभा होणार आहे. ज्या मैदानावर उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटावर आणि मुख्यमंत्र्यांवर टीकेची तोफ डागली होती. त्याच मैदानावरून आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे केलेल्या टीकेचा समाचार घेणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. उद्धव ठाकरे यांच्या सभेला उत्तर देण्यासाठी गोळीबार मैदानातच रामदास कदम यांच्या नेतृत्वाखाली एकनाथ शिंदे यांची जाहीर सभा होणार आहे. शिंदे यांच्या जाहीर सभेसाठी गोळीबार मैदानात स्टेज उभारणीला सुरुवात झाली आहे. गोळीबार मैदान हाउसफुल करण्यासाठी शिवसैनिकांची नियोजनाची कार्यकर्त्यांची फळी तयार करण्यात येत आहे.

Published on: Mar 16, 2023 04:58 PM
सरकार सकारात्मक प्रयत्न करतय, संप मागे घ्या; दादा भुसेंच आवाहन
‘माझ्या पत्नीला ब्लॅकमेल केलं आणि …’, देवेंद्र फडणवीस यांनी काय केला खुलासा?