भारताची चांद्रयान ३ मोहीम फत्ते; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया, म्हणाले…
VIDEO | भारताच्या चंद्रयान ३ मोहीमेच्या यशस्वी लँडिंगनंतर संपूर्ण देशभरात आनंद, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आनंद व्यक्त करत दिली प्रतिक्रिया म्हणाले... प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटावा असा हा आजचा क्षण आहे. या यशाने सर्व भारतीयांचा ऊर अभिमानाने भरून आला
मुंबई, २३ ऑगस्ट २०२३ | भारताच्या चांद्रयानाचं विक्रम हे लँडर यशस्वीरित्या चंद्रावर लँडिंग झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपली उत्स्फुर्त प्रतिक्रिया व्यक्त केली. ‘भारत आज महासत्तेकडे वाटचाल करीत आहे. त्यामुळे चांद्रयानाचे यश हे देशाच्या शिरपेचात
मानाचा तुरा रोवणारे ठरले आहे. या मोहिमेमुळे भारताचे अवकाश संशोधनातील श्रेष्ठत्व पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे’, असे म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी समस्त भारतीयांचं आणि शास्त्रज्ञांचं -अभिनंदन केले. वर्षा निवासस्थानी असलेल्या एकनाथ शिंदे यांनी इस्त्रोच्या कमांड सेंटरमधून सुरू असलेले प्रक्षेपण थेट पाहिले. यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांच्यासह उपस्थित सर्वांनी आनंद व्यक्त करत टाळ्या वाजवल्या आणि भारताची मोहीम यशस्वीरित्या फत्ते झाल्याबद्दल एकच जल्लोष व्यक्त केला. तसेच उपस्थित असलेल्यांना पेढेही वाटण्यात आले. प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटावा असा हा आजचा क्षण आहे. या यशाने सर्व भारतीयांचा ऊर अभिमानाने भरून आला आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.