Eknath Shinde : समृद्धीवर घडलेल्या घटनेवर मुख्यमंत्र्यांचं भाष्य; म्हणाले, दुर्देवी घटना… काय दिले कठोर आदेश?

| Updated on: Oct 15, 2023 | 4:03 PM

VIDEO | बुलढाण्याहून सैलानी बाबांचं दर्शन घेऊन परतत असताना संभाजीनगरच्या वैजापूर येथे समृद्धी महामार्गावर काल रात्री भीषण अपघात, मध्यरात्री जांबरगाव टोल नाक्याजवळ टेम्पोने ट्रकला दिली धडक, समृद्धीवर घडलेल्या घटनेवर मुख्यमंत्री शिंदे यांची प्रतिक्रिया

मुंबई, १५ ऑक्टोबर २०२३ | छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूर येथे समृद्धी महामार्गावर मध्यरात्री जांबरगाव टोल नाक्याजवळ टेम्पोने ट्रकला धडक दिल्यामुळे त्यातील १२ जणांचा मृत्यू झाला तर १० जणांहून अधिक जखमी झाले. हे सर्व प्रवासी नाशिक परिसरातील होते. दरम्यान, नागपूर – मुंबई समृध्दी महामार्गावर वैजापूरजवळ मध्यरात्री झालेल्या टेम्पो अपघाताबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून शोक व्यक्त करण्यात आलाय. तसेच या अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी पाच लाख रुपये आर्थिक मदतीची घोषणा केली आहे. तर जखमींवर शासकीय खर्चाने योग्य ते उपचार करावेत असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला दिले आहेत. हा अपघात झाल्याची माहिती मिळताच लगेच बचाव कार्य सुरू करण्यात आले, याविषयीही मुख्यमंत्र्यांनी माहिती घेतली आणि हा अपघात नेमका कशामुळे झाला त्याची चौकशी करून तपास करण्याचे आणि दोषींवर कारवाई करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. जे या घटनेमध्ये दोषी असतील, जे आरटीओ अधिकारी असतील, ट्रकचा चालक असेल, त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या असून त्या दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.

Published on: Oct 15, 2023 04:01 PM
Samruddhi Mahamarg : समृद्धीवर कोणते अडथळे, अमोल कोल्हे यांनी केला जुना व्हिडीओ शेअर, म्हणाले
Uday Samant : मंत्रिमंडळ विस्तारावर उद्योगमंत्री उदय सामंत यांचं वक्तव्य, कधी होणार मंत्रिमंडळ विस्तार?