सत्तासंघर्षावरील न्यायलयाच्या निर्णयावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले… ही आमची अपेक्षा

| Updated on: Feb 17, 2023 | 12:43 PM

VIDEO | राज्यातील सत्तासंघर्षावरील सर्वोच्च न्यायलयाच्या निर्णयावर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय म्हणाले बघा..

मुंबई : राज्यातील सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी नियमित सुनावणी घेणार असल्याचे म्हटले आहे. सत्तासंघर्षावरील सर्वोच्च न्यायलयाच्या निर्णयावर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. आमचा न्याय व्यवस्थेवर विश्वास आहे. मेरीटवर निर्णय व्हावा ही आमची अपेक्षा आहे. सरकार बहुमताचं आहे. कायद्याद्वारे स्थापित झालं आहे. सर्व नियम पाळून सरकार आलं आहे. लोकशाहीत घटना, कायदा आणि नियम आहेत त्यामुळे बहुमताला मोठं महत्त्व आहे. राज्यात बहुमताचं सरकार काम करत आहे. गेल्या ७ महिन्यांपासून लोकांच्या मनातील गरजा आणि आवश्यक बाबींची पूर्तता पूर्ण करत आहे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. सर्वोच्च न्यायालयात मेरीटवर निर्णय व्हावा. कारण हे कायद्याने स्थापित झालेलं सरकार आहे. आमच्याकडे बहुमत आहे. सरकारला कोणताही धोका नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

Published on: Feb 17, 2023 12:43 PM
सत्यजित तांबे अपक्ष आमदार तरी त्यांचा फोटो झळकला ‘या’ पक्षाच्या बॅनरवर
उन्हाचा पारा चढलेला त्यात चंद्रकांत पाटील यांचे ‘ते’ विधान, रोहित पवार यांचा संताप का वाढला ?