‘श्रीसदस्य मृत्यूप्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा राजीनामा घ्या’, कुणाची आक्रमक मागणी
VIDEO | खारघरच्या कार्यक्रमातील दुर्देवी घटनेप्रकरणी एकनाथ शिंदे यांच्यासह सुधीर मुनगंटीवारांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवण्याची कुणी केली मागणी?
मुंबई : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मोठी मागणी केली आहे. यामध्ये देवेंद्र फडणवीस विरोधात असते तर काय केलं असतं हे सांगत संजय राऊत यांनी सरकारवर टीका केला आहे. खारघर प्रकरणात मृत्यूचे आकडे लपवले जात आहे. त्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दबाव टाकला असा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. याप्रकरणात अद्याप 14 जणांचा मृत्यू झाला असला तरी हा आकडा 20 पर्यंत जाण्याची भीती व्यक्त केली जात असल्याचे संजय राऊत यांनी म्हंटलं आहे. संजय राऊत यांनी खारघर प्रकरणात उष्माघात हे कारण नसून सरकारने केलेले ढिसाळ नियोजन आहे. दरम्यान, यावरून संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांचा राजीनामा देवेंद्र फडणवीस यांनी मागायला हवा. सांस्कृतिक मंत्री यांचाही राजीनामा घ्या म्हणत सरकारवर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करा, अशी मागणी संजय राऊत यांनी केली आहे.