‘त्यांच्या पायावर एकदा नाही शंभरवेळा डोकं ठेवायला तयार’, मुख्यमंत्री शिंदे असं का म्हणाले?

| Updated on: Aug 30, 2024 | 3:27 PM

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथे असणाऱ्या राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुर्णाकृती पुतळा केवळ ८ महिन्यात कोसळ्याची दुर्देवी घटना घडली. या घटनेनंतर राज्यभरात शिवप्रेमींमध्ये संपाताची भावना आहे. यावर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुर्णाकृती पुतळा कोसळ्याची घटना ही दुर्दैवी आहे. छत्रपती शिवाजी महाराज ही आपली श्रद्धा, अस्मिता आहे, महाराज आपले आराध्य दैवत आहे. त्यामुळे विरोधक या घडलेल्या प्रसंगानंतर माफी मागावी अशी मागणी करतायंत, तर छत्रपती शिवाजी महाराज हे माझं आराध्य दैवत आहे. त्यांच्या पायावर मी एकदा नाही तर शंभर वेळा डोकं ठेवायला मी तयार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. सिंधुदुर्गमध्ये झालेल्या शिवरायांच्या पुतळा कोसळण्याच्या दुर्घटनेबाबत ते बोलत होते. तर या घटनेनंतर एका समितीची स्थापना करण्यात आली असून या समितीमध्ये नेव्हीचे अधिकारी, तज्ज्ञ शिल्पकार आणि इतर विषयातील तज्ज्ञांचा समावेश करण्यात आला आहे. लवकरात लवकर ही समिती काम सुरू करणार असल्याचेही एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे.

Published on: Aug 30, 2024 03:27 PM
शरद पवार केंद्र सरकराने दिलेली Z+ सिक्युरिटी नाकारणार? ‘या’ अटी अमान्य, कारण नेमकं काय?
‘मी डोकं ठेवून…’, मोदींची भरसभेत जाहीर माफी, शिवरायांचा पुतळा कोसळण्याच्या घटनेवर काय म्हणाले पंतप्रधान?