एकनाथ शिंदेंनी हेलिकॉप्टरने पाठवले AB फॉर्म, देवळाली-दिंडोरी मतदारसंघात महायुतीतच बंडखोरी

| Updated on: Oct 30, 2024 | 12:53 PM

दिंडोरी मतदारसंघात महायुतीत बंडखोरी झाल्याचे समोर आले आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून देवळाली आणि दिंडोरी मतदारसंघात आपले उमेदवार देण्यात आले आहेत.

Follow us on

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी नाशिकच्या देवळाली आणि दिंडोरी मतदारसंघातील उमेदवारांसाठी हेलिकॉप्टरने एबी फॉर्म पाठवलेत. नाशिकच्या देवळाली मतदारसंघात राजेश्री आहिरराव यांना विधानसभेचं तिकीट एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडून देण्यात आलंय तर दिंडोरी मतदारसंघातील धनराज महालेंना विधानसभेची उमेदवारी देण्यात आली आहे. तर देवळाली मतदारसंघात अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून सरोज अहिरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. यासोबतच दिंडोरी मतदारसंघातील अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून नरहरी झिरवळ यांना विधानसभेचं तिकीट देण्यात आलं आहे. त्यामुळे देवळाली येथे अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या सरोज अहिरे विरोधात शिवसेनेच्या राजश्री अहिरराव यांच्या विधानसभेचा सामना रंगणार आहे. तर दुसरीकडे अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून नरहरी झिरवळ यांच्या विरूद्ध शिवसेनेचे धनकाज महाले हे विधानसभेच्या रिंगणात उतरले आहेत. समीर भुजबळ यांच्या बंडखोरीनंतर एकनाथ शिंदे यांनी मोठी खेळी करत नांदगावमध्ये शिंदे गटाचे सुहास कांदे विधानसभेचे उमेदवार असणार आहेत.